7news indiaमहाराष्ट्र

व्यंकटेश बालाजी स्कूलचे स्कॉलरशिप परीक्षेत सुयश

@अंकुश अग्रवाल अकोला – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2023 च्या परीक्षेत स्थानिक व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलचे वर्ग आठवी चे, कु. सानिया तायडे 63.75 टक्के, प्रणव सगणे 62.41%, खुशाल पटेल 61.74%, स्वरीत मुंदे 58.38%, पार्थ देशमुख 58.38%, व वर्ग पाचवी ची कुमारी मंजिरी तिडके 59.33% गुण प्राप्त करून मिरीट मध्ये उत्तीर्ण होऊन स्कॉलरशिप करिता पात्र झाले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट देऊन कौतुक करण्यात आले . विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष अवधूत ढेरे सर उपाध्यक्ष उपाध्यक्ष प्रा. कुमुद ताई दुबे मॅडम, सचिव राजश्रीताई गोळे मॅडम, प्राचार्य सारिका कडू मॅडम, मिनाक्षी महाजन मॅडम, सुजित बनसोड अजय गोस्वामी तथा आपल्या आई-वडिलांना दिले l

SURAJ GUPTA

OWNER 7NEWSINDIA MO.9755797500

You cannot copy content of this page